Friday, July 23, 2010

पाउस आणि मी




पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबात,

सगळ  जग एकवटून येत.

डोळ्यामधल पाणी सुद्धा वाहण  आता विसरून जात,
जलधारांच्या वेगाबरोबर दुख: जणू ओसरून जात.


मातीच्या या सुवासासारख  दुसरं काही असत नाही,

कुपी मधल्या अत्तराला मनं  आता फसत नाही.

पावसाचे ते पाणी घराच्या छतावर
आपटत असते,

आपल्यातला बावरलेल्या आतम्याला जणू
मन  हे थोपटत असते. 

No comments:

Post a Comment